जन क्रांति संघ हे जनतेचे खुले लोकहितवादी संघटन आहे. लोकशाही मार्गाने एकत्र येवून शिबिरे, कार्यशाळा,पथनाट्ये,सभा,संमेलने
१) समाज बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा या करिता सामाजिक जागृती करून जीवनावश्यक मुलभूत समस्यांवर जागरूकता निर्माण करणे.
२) समाजातील सामजिक, शैक्षणिक, संस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रातील समस्या विरुध सामाजिक लढा उभारून त्या समस्या सोडवीण्याचा प्रयन्त करणे.
३) शैक्षणिक विकासातून अन्य सामाजिक विकास सहज होतो या करिता समाज जागृती करून आर्थिक शैक्षणिक मागासांना मदत करून पाठबळ देणे.
३) रस्ते ,वीज ,पाणी ,शिक्षण ,घरे , या सारख्या ज्वलंत आवश्यक विषयांबाबत हक्काची जाणीव करून देणे .
४) अंध ,अपंग ,मुकबधीर ,विधवा ,निराधार पिडीत यांच्या करिता पुनर्वसन केंद्र सुरु करणे, मदत पुरवणे व विकास करणे.
५) युवकांना बेरोजगारीच्या समस्येतून सोडविण्याकरिता युवक कल्याण नोकर भरती व स्वयंव रोजगार मेळावे घेवून युवकांचा आर्थिक सामाजिक विकास करणे.
६) स्त्रियांना त्यांच्या मुलभूत हकांची जाणीव करून देणे स्त्री स्वरक्षानाचे प्रशिक्षण देणे व त्यांना स्वयंरोजगार निर्मिती करणे.
७) भ्रष्टाचार निर्मुलन करिता माहितीच्या अधिकाराचे प्रशिक्षन देणे.
८) भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार करणे हा मुख्य मुद्दा जन क्रांती संघाचा आहे.
तुमच्या न्याय आणि हक्कासाठी सामिल व्हा.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा