जन क्रांति संघा च्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन संपन्न ठिकाण -बदर्खे ता पाचोरा जि जळगाव - Pramod Rohidas Pardeshi

गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

जन क्रांति संघा च्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन संपन्न ठिकाण -बदर्खे ता पाचोरा जि जळगाव

जळगाव ( पचोरा ): 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) औचित्य साधुन जन क्रांति संघ जिल्हा जळगाव च्या वतीने पाचोरा तालुक्यातील बदरखे येथे जन क्रांति संघ संस्थापक उपाध्यक्ष मा. डॉ. वर्षा चौरे व शिवसेना ता प्रमुख मा. रावसाहेब पाटिल यानीं आरोग्य शिबिराचे उदघाटण करून उपस्थीत तमाम नागरीकानां सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
व जन क्रांति सघाच्या व्यसपिठावरुन बदर्खे ते निपाणे रोड डांबरीकरण करण्याचे जाहिर केले तसेच लवकरच आ. किशोर आप्पा पाटिल याच्या हस्ते भूमिपुजन करण्यात येणार आहे असे आश्वासन मा. रावसाहेब पाटिल यानीं दिलेत तसेच जन क्रांति संघाचे प्रदेश संघटक मा. प्रमोद परदेशी यानी संस्थापक डॉ. संदीप घुगारे यांची जन क्रांति संघाची संकल्पना लोकंसामोर मंडली.
जन क्रांति संघाचे पदाधीकारी प्रदेश संघटक मा. प्रमोद परदेशी,उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. संदिप लांडगे,प्रदेश सरचिटणीस मा. दिलीप परदेशी, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रविण गढरी,पाचोरा ता. अध्यक्ष श्री. नरशिंगराव भुरे, ता. उपाध्याक्ष राहुल तिवारी,पाचोरा शहराध्यक्ष श्री. सचिन सोणावणे व राहुल परदेशी , काशिनाथ पवार,गजानन गढ़री, विशाल परदेशी याच्या उपस्थितित मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले.
गावातील १७६ रुग्णानी या शिबिरात लाभ घेतला असुन डॉ. उमेश शेजुल पाटिल, डॉ. संकेत कदम, डॉ. तुकाराम हेंडगे, सरकारी डॉ माळी, यानी रुगणांची तपासणी केली.
भव्य आरोग्य शिबिरा नंतर साय. ५.०० वा. सत्कार समारोहात मा. डॉ. वर्षाताई चौरे, नगरसेविका मा.द्वारकाताई सोनवणे व श्री. दिलीप परदेशी यांनी स्वामी विवेकानंद याच्या पुतळ्यास हार अर्पण करून दिप प्रज्वलित करुन सत्कार समारंभास सुरवात करण्यात आली.
पाचोरा शहर नगर पालिका नगरसेविका मा.द्वारकाताई सोनवणे, मल्हार सेना जळगाव जिल्हा सरचिटणीस मा संदिप मनोरे, दै.लोकसत्ता खानदेश श्री. अनिल सोनावणे बदर्खे गावातिल महिला सरपंच सौ.अनिताबाई पाटिल,उप सरपंच श्री किशोर परदेशी, कुसुंबा ( धुळे ज़िल्हा) गावातिल मा. उप सरपंच श्री. उत्तम परदेशी, श्री. अमृत गढरी काशीनाथ परदेशी ( आदर्श पोलीस पाटिल, बदरखे), माजी सरपंच श्रावन गढ़री, युवराज पाटिल, गबा बापू परदेशी, महिला मंडल आणि बदर्खे गावातिल सन्माननिय नागरीकांचा जन क्रांति संघ जळगाव च्या वतिने सत्कार करण्यात आला.
























































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा