ऑयिब या ट्यूब चॅनलवर नुकताच ‘एआयबी नॉकआऊट’ हा शो रिलिज झाला. या कार्यक्रमात विनोदाच्या नावाखाली एकमेकांवर अत्यंत अश्लील शब्दांचा वापर करुन बॉलीवूडच्या काही सेलिब्रिटींनी बॉलिवूडचे रुपांतर अक्षरःशा शहरी तमाशात केले.
ग्रामीण भागातील लोकांचे मनोरंजनाचे माध्यम असणाऱ्या तमाशाला अश्लीलतेचा बाजार म्हणवून हिणवणाऱ्या शहरी पांढरपेशा लोकांनी मात्र एआयबी नॉकआऊट सारख्या अश्लिल विनोद असणाऱ्या कार्यक्रमाला 4000 रुपयांचे टिकीट खरेदी करुन गर्दी केली. एकीकडे सुसंस्कृतपणाचा आव आणून ग्रामीण तमाशाला हिणवायचे तर दुसरीकडे एआयबी नॉकआऊट सारखे अश्लिल कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी करायची याला आता कोणता समाज म्हणावे हा एक प्रश्न आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा