संयम सुटलेले आमदार ते राज्यमंत्री - Pramod Rohidas Pardeshi

गुरुवार, २९ जून, २०१७

संयम सुटलेले आमदार ते राज्यमंत्री

Shivsena State Minister Gulabrao Patil

पन्नाशी गाठणाऱ्या गुलाबराव पाटलांची ही आमदारकीची तिसरी टर्म आहे. सरळ पंतप्रधानांची टवाळी करणाऱ्या आमदाराचे कर्तृत्व काय? पूर्वी ते एरंडोल-धरणगाव मतदारसंघाचे  आमदार होते. तेव्हा त्यांनी मतदारसंघात काय ठोस काम केलेय? उत्तर शून्य. आमदार निधीतील कामे तर होतच राहतात. गावोगावी आपल्या नावाची पाटी लावण्यासाठी कुचकामी प्रवेशद्वार बांधण्यापलीकडे यांची उडी गेली नाही.


गल्लीतल्या समस्या सोडविण्याची क्षमता नसलेले सेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी परवा पंतप्रधानांची नक्कल करून आपला दर्जा दाखवून दिला. एकीकडे सत्तेत सहभागाचे फायदे उचलायचे नि दुसरीकडे मित्रपक्ष भाजपावरच तोंडसुख घ्यायचे, अशी दुहेरी भूमिका सेनेची मंडळी घेताना दिसतात. टाळया मिळविण्यापुरती ही भूमिका सेना घेत असली, तरी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्तेतला एक सहभागी पक्ष म्हणून सेनेची ही भूमिका पटणारी नाही. गुलाबरावांनी पंतप्रधानांची केलेली टवाळी सेनेला गोड वाटत असली, तरी भाजपाने ही टिंगल का सहन करावी? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. हा प्रकार सतत दोन वर्षांपासून सुरू असल्याने भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना सेना आमदारांची वक्तवे आता असह्य होऊ लागली आहेत. देशाच्या पंतप्रधानांची नक्कल करणाऱ्या आमदाराच्या विरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

सेनेची संस्कृती ज्येष्ठांचा आदर बाळगणारी नसली तरी देशाच्या पंतप्रधानाची टिंगल सहन करण्याची सहनशीलता भाजपाकडेही नाही. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पाकिस्तानात त्यांच्यावर जी घाणेरडी टीका झाली, त्याचा काँग्रेसने नाही, तर भाजपानेच कडाडून विरोध केला होता. खुद्द नरेंद्र मोदी यांनी त्या वेळी मनमोहन सिगांसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. सेना आमदारांनी मोदींची केलेली टिंगल मात्र जिव्हारी लागणारी आहे. शिवाय ते सातत्याने हा प्रकार करीत आले आहेत. त्याची दखल न घेतली गेल्यास एका घाणेरडया राजकीय संस्कृतीच्या पायाभरणीचे केलेले ते समर्थन ठरेल. राजकीय टीकेलाही काही मर्यादा असते. शिवाय ती करण्याजोगे आपल्याअंगी कोणते मोठेपण आहे याचे भान ठेवायला हवे. कुठे गुलाबराव पाटील नि कुठे पंतप्रधान! परंतु सायंकाळ झाली की स्तर घसरतो अशी ज्यांची ख्याती आहे, त्यांना आपण कोणाविरुध्द काय बोलतोय याचे भान कोठले?

टाळया मिळतात म्हणून संदर्भहीन बोलण्याची आमदार गुलाबरावांची जुनीच खोड आहे. टाळया मिळविण्याचा असा कार्यक्रम ते अधूनमधून आयोजित करीत असतात. मग तो वर्षातून दोन-तीनदा काढला जाणारा शिंगाडे मोर्चा असो अगर आपल्या वाढदिवसानिमित्त सभा असो - स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या या आमदाराकडून लोकही आता फारशा अपेक्षा ठेवीत नाहीत. म्हणून तर परवा पाळधीसारख्या आपल्या राहत्या गावी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना जमवून त्यांनी स्वत: मिमिक्री सादर केली. त्यात भाजपा खासदार किरीट सोमय्यांपासून पंतप्रधान मोदीपर्यंत अनेकांच्या नकला करून टाळया मिळविल्या.

पन्नाशी गाठणाऱ्या गुलाबराव पाटलांची ही आमदारकीची तिसरी टर्म आहे. सरळ पंतप्रधानांची टवाळी करणाऱ्या आमदाराचे कर्तृत्व काय? पूर्वी ते एरंडोल-धरणगाव मतदारसंघाचे आमदार होते. तेव्हा त्यांनी मतदारसंघात काय ठोस काम केलेय? उत्तर शून्य. आमदार निधीतील कामे तर होतच राहतात. गावोगावी आपल्या नावाची पाटी लावण्यासाठी कुचकामी प्रवेशद्वार बांधण्यापलीकडे यांची उडी गेली नाही. याच मतदारसंघात यांच्यापूर्वी महेंद्रसिंग पाटील निवडून आले होते. त्यांनी अंजनी नदीवर लघुप्रकल्प मंजूर करवून आणला. एरंडोल तालुक्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटला. त्यानंतर गुलाबराव पाटील सलग दोन पंचवार्षिक निवडून आले. एकही ठोस काम नाही. मग मात्र लोकांनी खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला. निवडून दिले राष्ट्रवादीच्या देवकर यांना. त्यांनी गिरणा नदीवर पद्मालय लघुप्रकल्प मंजूर करवून आणला व कामही सुरू झाले. दुसरे मोठे काम धरणगाव व म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलांचे. ही दोन्हीही कामे आता पूर्ण होत आली आहेत. महेंद्रसिंग पाटलांनी राजकारणातून निवृत्ती घेतली, तर देवकर सेनेच्याच सुरेशदादांनी केलेल्या घरकूल घोटाळयाची फळे भोगताहेत. (या घोटाळयात देवकर हे एक आरोपी असल्याने तुरुंगामध्ये होते. आता जामिनावर मुक्त आहेत.) या दोन्ही नेत्यांशी तुलना केली, तर गुलाबरावांचे काम कुठेच दिसत नाही. म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये आमदारकी करताना मतदारसंघाला काय दिले? असा प्रश्न त्यांना कोणी विचारण्याअगोदरच दुसऱ्यांवर दुगाण्या झाडणे हा गुलाबरावांचा एककलमी कार्यक्रम असतो. भाजपावाले काम करू देत नाहीत असे भाषणातून सतत सांगायचे व आपली निष्क्रियता लपवायची, हेच धोरण त्यांनी अवलंबिले आहे.

एक निष्क्रिय आमदार असा लौकिक असताना पंतप्रधानांची टवाळी यांनी करावी यापेक्षा हास्यास्पद दुसरे काय असावे? तथापि नेहमीप्रमाणेच जाहीर भाषणात टवाळी करायची व कोपऱ्यात जाऊन पाय धरायचे, असेच गुलाबराव पाटील करीत आलेत. या वेळी मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ठोस भूमिका घेऊन गुलाबरावांना धडा शिकवावा, असा सूर सर्वत्र उमटत आहे.


संकलन: साप्ताहिक विवेक - चिंतामण पाटील


Image may contain: text
दै. सकाळ दि. १० जून २०१७ 

Image may contain: 1 person
प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी यांना दिलेली माहिती

Image may contain: 1 person, beard and text
दै. प्रभात - दि. १० जून २०१७ 
Image may contain: 1 person, beard and text
Pune Dailyhunt
Image may contain: 1 person, text
Pune PCMC News
Image may contain: 1 person, text
Vidharbh 24 News


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा