मुंबई विद्यापीठाची 'अधिसभा सदस्य' (सिनेट मेंबर) निवडणूक (2017) - विक्रांत पाटील - Pramod Rohidas Pardeshi

शनिवार, २४ जून, २०१७

मुंबई विद्यापीठाची 'अधिसभा सदस्य' (सिनेट मेंबर) निवडणूक (2017) - विक्रांत पाटील






प्रिय 'पदवीधर' मित्र-मैत्रिणींनो,


मुंबई विद्यापीठाची 'अधिसभा सदस्य' (सिनेट मेंबर) निवडणूक (2017) लवकरच होणार आहे. ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण विद्यापीठाचा संपूर्ण प्रशासकीय-शैक्षणिक-आर्थिक कारभार, शैक्षणिक धोरण, शैक्षणिक शुल्क, विद्यार्थ्यांचे हक्क आदी सर्वच महत्वाच्या विषयांवर विद्यापीठाच्या अधिसभेत महत्वाचे निर्णय घेतले जात असतात. देशपातळीवर लोकसभेचं किंवा राज्य पातळीवर विधानसभेचं जे महत्व आहे, तेच विद्यापीठ पातळीवर अधिसभेचं (सिनेट) महत्व आहे.

तुम्ही स्वत: पदवीधर विद्यार्थी असा वा नोकरदार वा व्यावसायिक, मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणा-या सर्वच्या सर्व महाविद्यालयांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्याचं किंवा न्याय मागण्याचं सर्वोच्च स्थान म्हणजे विद्यापीठाची अधिसभा.

तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी असा, वा तुमचा मुलगा किंवा मुलगी विद्यापीठाच्या अंतर्गत येणा-या कोणत्याही महाविद्यालयात शिक्षण घेत असू दे, अधिसभा सदस्य (सिनेट सदस्य) हेच एक माध्यम आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचा आवाज विद्यापीठाच्या प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत खणखणीतपणे पोहोचवू शकता.

म्हणूनच तुम्ही जर 'पदवीधर' असाल तर या निवडणुकीत तुम्ही सहभागी व्हायलाच हवं! मतदान करायलाच हवं!

तुम्ही फक्त एवढंच करायचं की, पदवीधर मतदार म्हणून स्वत:ची नोंदणी करुन घ्यायची. यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रे लागतील-

1. पदवी प्रमाणपत्र (कॉनवोकेशन सर्टिफिकेट)
2. एक फोटो
3. निवासाचा पुरावा (आधारकार्ड किंवा मतदार ओळख पत्र किंवा वाहन परवाना किंवा पासपोर्ट)


कृपया एक गोष्ट लक्षात ठेवा की, 'पदवीधर मतदार' म्हणून नोंदणी करण्याचा 30 जून हा शेवटचा दिवस आहे. म्हणून आता आणखी उशीर नको. आजच 'पदवीधर मतदार' म्हणून नोंदणी करुन घ्या.

ऑफीस पत्ता: विक्रांत पाटील बीजेपी ऑफीस, हॉटेल गार्डन समोर, मॉडर्न स्वीट्स, जुने पनवेल.

मो. 9920598666


आपला युवा मित्र
श्री. विक्रांत पाटील






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा