कॉपीला विरोध करणाऱ्या शिक्षिकेवर बलात्काराचा प्रयत्न- औसा तालुक्यातील मनोहर तांडा (लातूर) - Pramod Rohidas Pardeshi

बुधवार, १८ मार्च, २०१५

कॉपीला विरोध करणाऱ्या शिक्षिकेवर बलात्काराचा प्रयत्न- औसा तालुक्यातील मनोहर तांडा (लातूर)

जाहीर निषेद !!! जाहीर निषेद !!! जाहीर निषेद !!!

परिक्षा केंद्रावर कॉपीला विरोध करणाऱ्या भरारी पथकातील महिलेवरच बलात्काराचा प्रयत्न झाला आहे. लातूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे. औसा तालुक्यातील मनोहर तांडा या आश्रम शाळेत हा लाजिरवाणा प्रकार घडला आहे. कॉपी करणाऱ्यासाठी रोखल्याने गावगुंडांनी त्या शिक्षिकेला पळवून नेऊन तिच्या बलात्काराचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून दोघे फरार आहेत. याविरोधात भादा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. औसा तालुक्यातल्या मनोहरतांडा येथील प्रतिभानिकेतन आश्रमशाळेत दहावीचं परीक्षा केंद्र आहे. येथे परीक्षेत मुक्तपणे कॉपी चालते. यासाठी या तांड्याच्या परिसरातील गावचे गुंड तरुण अनेकांना पास करण्याचे गुत्तेच घेतात. त्यानुसार संबधित विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून हवी तेवढी रक्कम घेवून परीक्षा केंद्र मॅनेज करून निकाल हवा तसा लावण्याचा प्रयत्न केला जातो. शिक्षण अधिका-यांच्या सुचनेप्रमाणे या परीक्षा केंद्रावर एक महिला शिक्षिका पथकाच्या प्रमुख म्हणून आल्या होत्या. त्यांनी परीक्षे दरम्यान इमारतीच्या बाहेरून आणि मधून कॉपीला विरोध केला. परीक्षा संपेपर्यंत त्या याच केंद्रावर बसून होत्या. त्यामुळे कॉपी पुरविण्याचे गुत्ता घेतलेल्या अनेकांनी या महिला शिक्षिकेला शिवीगाळ केली. तसेच उचलून नेवून बलात्कार करण्याची धमकी दिली. परीक्षा संपल्या नंतर गावाबाहेर पडलेल्या या महिला शिक्षिकेच्या पथकाची गावगुंडांनी जीप अडविली. यानंतर कॉपीला विरोध करणा-या या शिक्षिकेला गुंडांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली एवढेच नव्हे तर या शिक्षिकेला आपल्या वाहनात कोंबून पळवून नेऊन बलात्काराचाही प्रयत्न केला.
संकलन - जन क्रांती संघ


#Pramod Pardeshi 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा