- Pramod Rohidas Pardeshi

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०१५


कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे संपुर्ण आयुष्य सामान्य माणसाच्या हिताचे रक्षण करण्यात गेले. पुरोगामी विचार टिकवण्यासाठी त्यानी संघर्षाची भुमिका घेतली. त्यानीं कुणाचा व्यक्तिगत द्वेष केला नाही, त्यांना कुणी शत्रू असतिल, आसे वाटत नाही. त्यांची भुमिका न पटणार्या अशा प्रतिगामी शक्ती या हल्ल्या मागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉ गोविंदराव पानसरे व त्यांच्या पत्नीवर कोल्हापुरात झालेल्या दुर्दैवी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. पुरोगामी महाराष्ट्रात असे घडने निषेधार्ह आहे, सामाजिक काम करणार्या सामाजिक सघटनेच्या कार्यकर्त्यापुढे अशा घटना मोठे प्रश्नचिन्ह उभे करतात.अशा हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्यात आले नाही, तर जन क्रांति संघ सर्वत्र आंदोलनाचे हत्यार उपासणार.त्यांच्यावरील उपचाराना यश यावे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.जय भारत -

Pramod Pardeshi ( Jan Kranti Sangh )

 










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा