मध्यप्रदेश राज्यव्यापी धनगर समाज संमेलन !! विशाल रॅलीने कार्यक्रमाची सांगता , देशव्यापी धनगर परिषदेचे लवकरच शिर्डीत आयोजन - Pramod Rohidas Pardeshi

मंगळवार, ६ जून, २०१७

मध्यप्रदेश राज्यव्यापी धनगर समाज संमेलन !! विशाल रॅलीने कार्यक्रमाची सांगता , देशव्यापी धनगर परिषदेचे लवकरच शिर्डीत आयोजन









  सारंगपूर  ( प्रतिनिधी ):  मध्यप्रदेश मधील राजगड जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९२ व्या जयंती निमित्ताने धनगर समाजाचे विशाल संमेलन आणि रॅलीचे आयोजन दि. ४ जुन रोजी  करण्यात आले होते, इतिहासकार घनश्याम होलकर यांच्या ५ व्या पुस्तकाचे  "राज माहेश्वर" प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑल इंडिया धनगर महा संघाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीराम पाल होलकर , स्वागत अध्यक्ष श्रीमंत. सूर्यकांत बारगळ इन्दोर होते , तर प्रमुख अतिथी म्हणुन राजस्थान चे पशुसंवर्धन मंत्री ना. जगमोहन जी बघेल महाराष्ट्रातुन  आमदार रामराव वडकुते परभनी, धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष बापुसाहेब शिंदे, नाशिक  नरेंद्र मोदी विचार मंचाचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रमोद परदेशी पुणे , जेष्ठ साहित्यिक गोंविद काळे सोलापुर , धनगर समाजाचे इतिहासकार, लेखक घनश्याम होळकर , राजस्थान आदिसह राजस्थान , उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश , दिल्ली राज्यातील समाज बांधव मोठ्या संख्याने उपस्थितीत होते, देशभरातील धनगर समाज जागृत होत असुन समाजातील शाखा पोट शाखा बंद  कराव्यात , सर्वांनी धनगर म्हणुनच उल्लेख करावा , असा सुर सर्व राज्यातील प्रतिनिधीनी आवळला होता. तसेच समाजिक संघटन, शिक्षण , आरक्षण, राजकारण या विषयी मान्यवरांनी आपले विचार प्रखरपणे मांडले !  महाराष्ट्राच्या वतिने आ. रामराव वडकुते बापुसाहेब शिंदे, गोविंद काळे यांनी आपले विचार मांडले , यावेळी  उपस्थितीत मान्यवरांना स्मृती चिन्ह देऊन  सन्मानीत करण्यात आले, कार्यक्रमास महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. कार्यक्रमाचे नियोजन चांगले होते, देशव्यापी प्रमुख समाजसेवी आणि लोकप्रतिनीधीचे एक दिवसाचे धनगर परिषद श्रीक्षेत्र शिर्डी कींवा आलाहाबाद (काशी ) येथे आयोजित करण्यात यावे आशी  इच्छा समाज बांधवाच्यावतीने व्यक्त करण्यात आली, या विषयी लवकरच नियोजन करावे , त्यासाठी लागणारी मदत उभी केली जाईल असे सुचित करण्यात आले ,या कार्यक्रमास ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच निरंजन धनगर मथुरा, प्रेमपाल धनगर दिल्ली , भवरसिंह जी होलकर , अजयपालसिंह होलकर, बनीसिंह धनगर,  यशवंत चौधरी, विष्णुप्रसाद चौधरी, रतनलाल गाड़री, राजीवकुमार बघेल, ओमप्रकाश पाल, मा. आ. राधेलाल बघेल (म.प्र.), हरीओम बघेल आदिसह अनेक मान्यवर उपस्थितीत होते.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा