Gulabrao Patil (State Minister Govt. Of Maharashtra) |
मंगळवार, १३ जून, २०१७
सहकार राज्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी
(प्रतिनिधी) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करुन खिल्ली उडवणारे राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नरेंद्र मोदी विचार मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युतीचे सरकार असताना राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील प्रधानमंत्री मोदी यांची वारंवार बदनामी करत आहेत. काही दिवसापूर्वी गुलाबराव पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांची एका जाहीर सभेत नक्कल करुन खिल्ली उडवली होती. तसेच काल (शुक्रवार) पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत भाजपवर टीका केली होती.
भाजप शेतकरी आंदोलनात फूट पाडत आहे, असे वक्तव्य मंत्री पाटील यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात अपप्रचार करण्यापेक्षा गुलाबराव पाटील यांनी आपली पात्रता तपासावी. 420 च्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेल्या पाटील यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा. अन्यथा पाटील यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मंचाचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद परदेशी यांनी दिला आहे.
About Narendra Modi Vichar Manch
Pramod Rohidas Pardeshi ( प्रमोद रोहिदास परदेशी ) (Born on 30th June 1988) is an Indian social Work, politician Maharastra state.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा