राजमाता -राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन ! - Pramod Rohidas Pardeshi

मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

राजमाता -राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन !

आज १२ जानेवारी !याच महान महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला जन्म देणाऱ्या माउलींची जयंती !हरवलेल्या स्वाभिमान
आणि अस्तित्वाला पुनरजन्म देणारी माता !
आपल्या पोटचा गोळा स्वराज्यास अर्पण करून या मातीला आपला पहिला छत्रपती राजा देणारी माता म्हणजेच "राजमाता जिजाऊ मॉ साहेब"यांची जयंती.
अगदी कालपरवाच अखंड क्रांतीज्योती सावित्रीबाईंची हि जयंती पार पडली, 
कुठे कुठे
या जयंत्या मोठ्या प्रमाणावर
साजऱ्या हि होत असतील.
आजच्या या दिनी आम्हाला एक प्रश्न पडलाय कि ज्या इतिहासाचे दाखले देऊन आम्ही नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहतो निदान त्या इतिहासाने तरी आमच्या या प्रेरणामुर्तींसोबत न्याय केलाय का?
जिजाऊ शिवाय शिवबा छत्रपती झाला असता ?
ज्योतीराव कुणाच्या खांद्याला खांदा लाऊन स्त्री शिक्षणासाठी झगडले असते ?
या थोर स्त्रीयान्शिवाय इतिहास हा इतिहास तरी झाला असता का ?
शेवटी इतिहासाला जन्म द्यायला हि एक माउली च लागते हे हि आम्ही विसरलो ?ज्या समाजात हजारो वर्षे
स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, दुर्गा - शक्ती अशी उपमा तर देतात पण सर्वात जास्त अत्याचारहि तिच्यावरच होत असतात, मग
अश्या समाजाला जिजाऊ-सावित्रीबाई सारख्या असामान्य
महिलांची ओळख करून देण्यात हा इतिहास का कमी पडला ?आज हि स्त्री हि दुय्यमच, मग ती दलिताची असो वा सवर्णा ची !
हिंदूंची असो व मुस्लिमांची !
तीच गुलामगिरी तोच अन्याय !
अगदी आमच्या घरा -घरापर्यत
हि असमानता !
आज हि गर्भातच तिची हत्या !
मग हे धड धडीत सत्य समोर
असतांना का इतिहासकार का कमी पडले ह्या असामान्य स्त्रियांचे संस्कार रुजवण्यात !
बर ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या पाठीशी समाज तरी उभा राहिला का?
आजचा दिवस म्हणजे एक नवा इतिहास जन्माला घालणाऱ्या माउली चा जन्म दिवस !
पुन्हा एकदा राजमाता -राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन !
जय जिजाऊ - जय शिवराय
जय भारत
आपलाच
श्री. दिलीप ज परदेशी
प्रदेश सरचिटणीस
जन क्रांति संघ
संपर्क-0987102625/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा